ठाणे महापालिका होर्डींग, पदपथ आणि पर्यटनासाठी धोरण आखणार

ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरामध्ये लावले जाणारे होर्डींग्ज, नागरिकांसाठी पदपथ आणि पर्यटनासाठी धोरणाचा मसुदा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे शहरामध्ये किती क्षेत्रामध्ये होर्डींग्ज लावता येईल, कोणत्या आकाराचे लावता येईल यासाठी नवीन जाहिरात फलक धोरण आखण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना चालण्यासाठी नीटनेटके पदपथ करणे आणि शहराचे पर्यटन मूल्य वाढावे यासाठी विशेष धोरण तयार करण्याकरिता समित्या स्थापन करण्याबरोबरच या समित्यांनी याविषयीच्या धोरणाचा मसुदा एक आठवड्याच्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता भेंडाळे यांची समिती नेमण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading