समूह विकास योजनेत समावेश झाल्यामुळे सिध्देश्वर तलाव परिसरातील २ हजार कुटुंबांचं घराचं स्वप्न होणार साकार

महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिध्देश्वर तलाव परिसरातील झोपडपट्टीमध्ये वास्तव करणा-या सुमारे २ हजार कुटुंबियांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न आता साकार होणार आहे. महापालिकेनं समूह विकास योजनेच्या आराखड्यात सिध्देश्वर तलाव परिसराचाही समावेश केला आहे. सिध्देश्वर तलाव हा पुरातन तलाव असून या तलावाभोवतालच्या झोपडपट्टीमध्ये २ हजार कुटुंबं वास्तव्य करत आहेत. तर अनेक वर्षापासून या भागात ६० ते ७० जुन्या इमारतीही आहेत. गेल्या काही वर्षापासून सिध्देश्वर तलाव परिसरात विकास होत होता. मात्र झोपडपट्टीतील रहिवाशांना जुन्याच घरात रहावं लागत होतं. या भागाचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातूनही विकास करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर समूह विकास योजनेत सिध्देश्वर तलाव परिसराचा समावेश करण्यासाठी नगरसेवक नारायण पवार प्रयत्नशील होते. आता या परिसराचा समावेश समूह विकास योजनेत झाला आहे. त्यामुळं २ हजार कुटुंबांच्या घराचा प्रश्न सुटणार असून या परिसरातील अनधिकृत इमारतींचाही यात समावेश होणार आहे. त्यामुळं शेकडो कुटुंबांना अधिकृत घर उपलब्ध होईल असं नारायण पवार यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading