समाजाला जोडणा-या दुव्यांना एकत्रित करा – डॉ. अनिल काकोडकर

समाजाला जोडणा-या दुव्यांना एकत्रित करा असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी ठाण्यात बोलताना केलं. वुई नीड यू सोसायटीच्या समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती पुरस्कारांचं वितरण काकोडकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. शिक्षणव्रती पुरस्कार मिळवणा-या ठाणे आर्ट सोसायटीच्या निलिमा कडे, कार्यव्रती पुरस्कार मिळवणारे हेमंत जगताप आणि समाजव्रती पुरस्कार मिळवणा-या चारूशीला देवकर यांचा काकोडकर यांच्या हस्ते मानपत्र आणि २५ हजार रूपये देऊन गौरव करण्यात आला. समाजात विविध प्रश्नांवर कार्यरत असणा-या व्यक्ती आणि संस्थांना शोधून समाजासमोर आणण्याचं काम वुई नीड यू सोसायटीनं केलं हे महत्वाचं असून कला, समुपदेशन आणि पाणी या तीनही जीवनावश्यक गोष्टी आहेत. हे कार्य करणारे सर्वजण केवळ स्वत:पुरते कार्यरत नसून समाजासाठी काम हेच त्यांचं भव्य स्वप्न आहे. अशा सर्व संस्थांना आणि व्यक्तींना जोडणारा दुवा वुई नीड यू सोसायटीनं होण्याची गरज डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केली. काकोडकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांचाही मानपत्र आणि शाल देऊन खास गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading