साठेनगर येथे जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसच्या पाईपलाईनला नुकसान

महानगर गॅस पाईपलाईन आज साठेनगर येथे नादुरूस्त झाली. मात्र यामध्ये सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही. साठेनगर येथे जमिनीखाली जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसच्या पाईपलाईनला नुकसान झालं. सुदैवानं यावर वेळीच नियंत्रण आणण्यात आलं. महानगर गॅस पाईपलाईनचे अधिकारी, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक यांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळं कोणतीही दुर्घटना झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading