समतानगर चौकासमोरील वळण रस्ता आमदार प्रताप सरनाईकांच्या आंदोलनानंतर सुरू

समतानगर चौकासमोरील वळण रस्ता आमदार प्रताप सरनाईकांच्या आंदोलनानंतर सुरू करण्यात.
गेल्या काही दिवसांपूर्वी समतानगर येथील चौकासमोरील वळण रस्ता वाहतुक विभागाच्या प्रशासकिय अधिका-यांच्या माध्यमातून बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला होता. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाश्यांनी आंदोलन करून हे वळण रस्त्यावर लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटविण्यात आले. नागरिकांना रहदारीचा त्रास होऊ नये याकरिता पोखरण रोड नं. १ हा रस्ता तात्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात रूंदीकरण करण्यात आला होता. हा रस्ता बनविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी स्वत:ची मालकी हक्क असलेली घरे दिली असून शहरातील सर्वात जास्त रूंदीकरणाचा रस्ता म्हणून ओळखण्यात येतो. मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अड़थळा होत असल्यामुळे पोलिस वाहतुक विभागाच्या अधिका-यांनी समतानगर चौकासमोरील वळण रस्ता बॅरिकेट्स लावून बंद केला. जर रहदारीचा प्रश्न उद्भवत असेल तर वाहतुक विभागाच्या अधिकार्यांनी रेमंड कंपनी समोरील जाणारा रस्ता सोडला, सिंघानिया शाळेला जाणारा सोडला पण समतानगर चौकासमोरील वळण रस्त्यावरून लाखों लोकांची वर्दळ होत असून समतानगर मधील स्थानिक नागरिकांचा त्यासाठी विरोध असताना देखील हा वळण रस्ता का बंद करण्यात आला असा प्रश्न प्रताप सरनाईक यांनी विचारला. समतानगरमधील १८ मीटर रस्ता पुढे लुईसवाडीला जावून मिळतो त्यामुळे तेथे वाहतुक वर्दळ जास्त असते. बाजूला असलेल्या रेमंड कंपनी आणि सिंघानिया शाळेला झुकते माप देण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, वाहतुक पोलिस यांच्या संगनमताने स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक यांना विश्वासात न घेता असा तुघलघी निर्णय घेण्यात आला. स्थानिक नागरिकांकरिता रस्तावर उतरून आंदोलन करावे लागले तरी आपली तयारी आहे असे सरनाईक यांनी सांगितले. महापालिकेच्या अधिका-यांचा मनमानी कारभार चालू असून स्थानिक आमदार म्हणून काळे कपडे घालून प्रशासनाच्या या वृत्तीचा निषेध करीत असल्याचं आहे असे सरनाईक यांनी सांगितले. यावेळी महापालिकेचे अधिकारी ढोले यांना बोलावून समतानगर चौकासमोरील डिव्हायडर मधील रस्ता तात्काळ पुर्ववत करून तेथे सिग्नल यंत्रणा बसविण्यासंदर्भात संबंधित विभागास प्रताप सरनाईक यांनी सुचना दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading