मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात ३९ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल अभिहस्तांतरीत

ठाणे परिमंडळ १ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात ३९ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल अभिहस्तांतरीत करण्यात आला. रेझिंग डे च्या निमित्तानं परिमंडळ १ तर्फे ठाणे कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मूळ मालकास परत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात ३९ लाख ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अभिहस्तांतरीत करण्यात आला. यामध्ये घरफोडी, जबरी चोरी, फसवणूक, चैन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग तसंच इतर गुन्ह्यातील मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading