संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जाणारा समतानगर मधील नवरात्रौत्सव यंदा रद्द

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जाणारा समतानगर मधील नवरात्रौत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवही अतिशय साधेपणाने साजरा झाला. त्यामुळे दरवर्षी उत्साहात साजरा होणारा नवरात्रौत्सव कोरोनामुळे यंदा साजरा करणं शक्य होणार नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. नवरात्रौत्सवात देवी दर्शनासाठी, गरबा खेळणा-यांची आणि पहाणा-यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे यावेळी सोशल डिस्टंन्सिगचं पालन होणार नाही. यंदा आपल्यापुढे कोरोना चे मोठे संकट असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी संस्कृती युवा प्रतिष्ठानचा समतानगर मधील प्रसिध्द नवरात्रौत्सव रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याचे प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती लक्षात घेता नवरात्रौत्सव रद्द करणे हेच प्रत्येकाच्या आरोग्याच्या व समाजाच्या दृष्टीने योग्य आहे. विविध प्रकारची पारितोषिके तसेच इतर नियोजनापोटी होणारा खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांसाठी एक लाख मोफत सॅनिटायझर आणि मास्क वाटप तसेच शाखा तिथे दवाखाना या संकल्पनेनुसार शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत शरिराचे तापमान तपासणी यंत्र आणि ऑक्सिजन लेवल तपासणी यंत्र प्रत्येकी एक-एक उपलब्ध करून दिले जाईल तसंच कोरोनाबाधीत रूग्णांना मोफत पोर्टेबल ऑक्सिजन मशीन प्रत्येक शाखेतून उपलब्ध करून दिले जाईल. ज्या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिल्या जातात त्या नागरीकांना विनामूल्य देण्यात येतील असंही सरनाईक यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading