संदीप स्पोर्टस् जिम्नॅस्टीक स्पर्धेत ६ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलामुलींचं घवघवीत यश

ठाणे महापालिका क्षेत्रातील मनिषा विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संदीप स्पोर्टस् जिम्नॅस्टीक स्पर्धेत ६ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलामुलींनी भाग घेऊन घवघवीत यश मिळवलं. संदीप स्पोर्टस् ही संस्था जिम्नॅस्टीकच्या माध्यमातून खेळाडू बनवण्याचं कार्य करत आहे. या स्पर्धेत ६ वर्षाखालील मुलांमध्ये नीरज बुंदे प्रथम, पार्थिक वर्मा द्वितीय, अद्वैत पवार तृतीय, ६ वर्षाखालील मुलींमध्ये हृदया वरे प्रथम, सोमाश्री आचार्य द्वितीय, वरूण पेडणेकर तृतीय, ८ वर्षाखालील मुलं अथर्व पेडणेकर प्रथम, शार्दुल बांदिवडेकर द्वितीय, ओम कंद तृतीय, ८ वर्षाखालील मुलींमध्ये सखाना रेडीयर प्रथम, उन्नती भदाने, द्वितीय, १० वर्षाखालील मुलं-मुली वैदेही राहुल आणि वंश रावळ प्रथम, तनिष्का सडेकर आणि अनिकेत वर्मा द्वितीय, किर्ती पांचाळ आणि ध्रुवन शिंदे तृतीय, १२ वर्षाखालील मुलं आदित्य चौधरी प्रथम, देवराज माने द्वितीय, वीर डांगे तृतीय, १४ वर्षाखालील मुलं रिध्दी कोचरेकर प्रथम, स्वामिनी पेडणेकर द्वितीय तर सेजल गुप्ताने तृतीय क्रमांक पटकावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading