कोंबड्यांची वाहतूक करणा-या गाडीनं बॅरिकेटला धडक दिल्यामुळे अपघात

आज पहाटे एक विचित्र अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणा-या गाडीनं बॅरिकेटला धडक दिल्यामुळे त्याचा इतर दोन वाहनांना फटका बसला. यामुळं घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणारी १ पिकअप गाडी घोडबंदर रस्त्यावरून जात होती. त्यावेळी पूर्व द्रूतगती महामार्गावर ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ या गाडीनं बॅरिकेटला धडक दिली. बॅरिकेटला धडक दिल्यामुळे गाडी उलटी झाली आणि तिचा धक्का दोन वाहनांना बसून या दोन वाहनांचाही अपघात झाला. यामध्ये या पिकअपचा चालक अकील अहमद आणि क्लीनर सय्यद शेख हे दोघं किरकोळ जखमी झाले तर टँकर आणि कंटेनरला धडक बसूनही सुदैवानं टँकरचे चालक विश्वंभर प्रसाद आणि कंटेनरच्या चालकाला या अपघातामध्ये फारसं काही लागलं नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading