श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप

राज्यात कोरोनाने थैमान घातलं असून जिल्ह्यातील बहुतांश महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास किंवा संवेदनशील परिस्थितीत रुग्णास जिल्ह्याअंतर्गत अथवा जिल्हाबाह्य रुग्णालयात घेऊन जात असताना, ऑक्सिजन अभावी रुग्ण वाटेतच दगावले असल्याची घटना घडत आहेत. रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहावी या दृष्टीकोनातून श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कल्याण, डोंबिवली तसंच इतर शहरांतील कोरोना बाधित रुग्णांना घेता येणार आहे. या योजनेद्वारे कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर द्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading