शिवाईनगर मधील नागरिकांच्या सुविधेसाठी खुला रंगमंच आणि वाचनालयाचं भूमीपूजन

शिवाईनगर मधील नागरिकांच्या सुविधेसाठी खुला रंगमंच आणि वाचनालयाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. नगरसेविका या नात्याने परिषा सरनाईक यांनी महापालिकेकडे यासाठी पाठपुरावा करून मंजुरी मिळवली. या ठिकाणी तळमजल्याला खुला रंगमंच, पहिल्या मजल्यावर वाचनालय आणि टेरेसवर कार्यक्रमासाठी हॉल असणार आहे. त्याचबरोबर येऊर येथील नागरिकांना वैद्यकिय सुविधा देण्याकरिता प्रशासनाच्या वतीने आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे त्याचा उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. उपवन तलावाच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधणे, येऊर येथे नागरिकांना जॉगिंगसाठी जॉगिंग ट्रॅक उभारणे, नागरिकांमध्ये कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी रिक्षा स्टॅन्ड आणि बस स्टॉपवर कॅन्सरविषयी जनजागृती संदेश देणे, शिवाईनगर मधील समाज मंदिराचे सुशोभिकरण करणे आदी विकास कामांकरिता आमदार निधी देण्यात येईल तसेच शिवाईनगर शाळेच्या मुलांसाठी प्ले ग्राउंड आणि पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading