शिवसेनेतर्फे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

शिवसेनेतर्फे सुप्रसिध्द अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड निवडणूक लढवत असून अगदी अखेरच्या दिवशी दीपाली सय्यद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दीपाली सय्यद यांनी दोनच दिवसापूर्वी शिवबंधन बांधलं होतं. लगेच त्यांना कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. आता त्यांची लढत जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या तुल्यबळ उमेदवाराशी होणार आहे. त्यामुळं या मतदारसंघातील निकालाकडे राजकीय निरिक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading