जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, प्रहसनातून केले मतदानाचे आवाहन

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदानाला चला हो दादा, मतदानाला चला, कर्तव्याची जाण, करा मतदान अशी साद घालत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, प्रहसनातून मतदानाचे मतदारांना आवाहन केले. मतदाता जनजागृती अभियानांतर्गत विविध स्पर्धा काल झाल्या त्यावेळी विद्यार्थ्यांनी हे आवाहन केलं. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनीही यावेळी २१ ऑक्टोबरला मतदान करण्याचं आवाहन केलं. जिल्ह्यातील युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या दोन दिवसापासून गडकरी रंगायतनमध्ये कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, डोंबिवली, उल्हासनगर आणि शहरातील विविध वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, प्रहसनाचं सादरीकरण केलं. या सादरीकरणातून मतदानाचं महत्व अधोरेखित केलं. विद्यार्थ्यांचा अभिनय, शब्दफेक आणि सादरीकरणामुळे कार्यक्रमात रंगत आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading