शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून पुन्हा समन्स

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे. टॉप ग्रुप गैरव्यवहार प्रकरणात हा समन्स बजावण्यात आला आहे. गेल्या बुधवारी प्रताप सरनाईक आणि त्यांच्याशी संबंधित १० ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक हे बाहेर होते. अंमलबजावणी संचालनालयानं विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी कार्यालयात नेलं होतं. मात्र नंतर त्यांची सुटका झाली होती. आता याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं प्रताप सरनाईक यांना दुस-यांदा तर विहंग सरनाईक यांना चौथ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावला आहे. उद्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास बजावण्यात आलं आहे. त्यामुळं या दोघांना उद्या अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading