आधाररेखा प्रतिष्ठानतर्फे कर्करूग्णांसाठी ठाणे ते टाटा हॉस्पिटल विनामूल्य बससेवा

आधाररेखा प्रतिष्ठानतर्फे कर्करूग्णांसाठी ठाणे ते टाटा हॉस्पिटल अशी विनामूल्य बससेवा सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात विशेषत: कर्करुग्णांच्या सहाय्यार्थ स्वयंसेवी वृत्तीने कार्यरत असणारी आधाररेखा प्रतिष्ठान ही ठाण्यातील नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आधाररेखा प्रतिष्ठान तर्फे तज्ज्ञांची व्याख्याने, आरोग्य शिबिरे, योगवर्ग, कर्करोगावरील पुस्तकांची लायब्ररी, आधारमाला ही Web session series अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. आधाररेखा एक नवीन योजना आखीत आहे. कर्करुग्णांना उपचारादरम्यान टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे बस, लोकल ट्रेन सारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे खूप जिकिरीचे असते. सध्या करोनाच्या सावटामध्ये तर ते अधिकच कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत आधाररेखा प्रतिष्ठान ठाणे ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ पर्यंत वाहतूक व्यवस्था सुरु करीत आहे. ही योजना विनामूल्य असून रुग्ण आणि त्याचा एक नातेवाईक याचा लाभ घेऊ शकेल. यासाठी रुग्णाकडे टाटा मेमोरियल हॉस्पिटलची उपचार सुरु असल्याची फाईल आणि ओळख पत्र असणे आवश्यक आहे. ही योजना डिसेंबर २०२० पासून सुरु करण्याचा संस्थेचा मानस आहे. सुरवातीस या योजनेचा भिवंडी आणि ठाणे, कल्याण आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी ही सेवा उपलब्ध असणार आहे. या क्षेत्रातील रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी रश्मी जोशी यांच्याशी ९८६९४६५१४४ आणि सुमिता दिघे यांच्याशी ९८६९२८३८५७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading