शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास कलाकारांनी दिली भेट

ठाण्यातील तीन हात नाका परिसरात उभारण्यात आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास काही कलाकारांनी भेट दिली. हे स्मारक भावी पिढीला प्रेरणादायी ठरेलच पण बाळासाहेबांच्या कलाप्रेमी कर्तृत्वाला हे स्मारक साजेसं असल्याची दाद या कलाकारांनी दिली. महापौरांसमवेत संगीतकार कौशल इनामदार, अभिनेते सुबोध भावे, लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक रवि जाधव यांनी या स्मारकाला भेट दिली. शिवसेना प्रमुख हे व्यंगचित्रकार होते हे जरी सर्वांना ज्ञात असलं तरी ते भावी पिढीला या स्मारकाच्या माध्यमातून ज्ञात होते. नव्या पिढीला हे स्मारक प्रेरणादायी ठरेल असा विश्वास या कलाकारांनी व्यक्त केला. ६ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. लोकार्पणानंतर या स्मारकास ठाणेकर भेट देत असून या ठिकाणी कलाप्रेमी एकत्र येऊन कार्यक्रम सादर करत आहेत. या ठिकाणी कौशल इनामदार, रवि जाधव, सुबोध भावे यांनी कला सादर करण्याची इच्छा व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading