ठाण्यात विशेष मुलांची युनिफाईड फूटबॉल स्पर्धा

ठाण्यात विशेष मुलांची युनिफाईड फूटबॉल स्पर्धा झाली. या फूटबॉल स्पर्धेत ८ शाळांतील मुलं सहभागी झाली होती. स्पेशल ऑलिम्पिक भारत, महाराष्ट्र शाखा आणि मौर्य फौंडेशन आयोजित विशेष मुलांच्या या युनिफाईड फूटबॉल स्पर्धेत प्रत्येक संघात तीन विशेष मुलं आणि दोन सर्वसाधारण मुलांचा समावेश होता. आपल्यातील उणिवा मागे टाकून खेळाचा जोरदार सराव केला असल्याचं या मुलांचा खेळ पाहून सर्वांच्या लक्षात आलं. स्पर्धेतील सामने साखळी पध्दतीनं खेळवण्यात आले. या मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सांघिक विजेता न ठरवता त्यांच्या बुध्यांकानुसार सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकं देऊन त्यांना गौरवण्यात आलं. मानखुर्द येथील एमबीसीएच, वसंतविहार, जिद्द शाळा, स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान, सुहित जीवन ट्रस्ट, क्षितीज मतिमंद मुलांच्या शाळांचे दोन संघ आणि स्नेहालय शाळेच्या खेळाडूंनी फूटबॉलमधील आपलं कौशल्य यावेळी दाखवलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading