गोवा बनावटीचं मद्य विकणा-या ४ मद्य तस्करांच्या मुसक्या आवळून साडेअकरा लाखांचे मद्य हस्तगत

गोवा बनावटीचं मद्य विकणा-या ४ मद्य तस्करांच्या मुसक्या राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाच्या ठाणे भरारी पथकानं आवळल्या असून त्यांच्याकडून रिक्षासह साडेअकरा लाखांचे मद्य हस्तगत केलं आहे. गोव्याची दारू पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरून मद्य तस्करी करण्याचा नवा फंडा उघडकीस आला आहे. गोवा बनावटीची दारू पिकअप मधून महाराष्ट्रात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकानं डोंबिवलीतील भोपरगाव येथे पाळत ठेवली होती. त्यावेळी मद्य तस्करी करणा-या वाहनाऐवजी येथील चाळीत दोन गोदामांमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे ८० बॉक्स, विविध ब्रँडस् ची लेबल्स आणि बूचं हस्तग्त करण्यात आली. सुमित नायक आणि कुमार भंडारी अशा दोघांनाही अटक करण्यात आली. तर दुस-या कारवाईत म्हारळ गाव येथील धोबीघाटात एका रिक्षामधून ९ बॉक्ससह संतोष विरारे आणि निलेश शिंदे या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघे भामटे गोवा बनावटीची दारू पाण्याच्या १ लिटरच्या बाटल्यांमध्ये भरून नंतर विदेशी मद्याच्या बाटल्यांमध्ये भरून वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाने विक्री करत असत. अशाप्रकारे या दोन्ही कारवाईत वाहनांसह ११ लाखाहून अधिक रूपयांची गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading