शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा ‘दे धक्का’

ठाण्यातील उद्ध्व बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्याच्या प्रभागातील सिध्देश्वर तलाव , खोपट , कोलबाड विभागात राहणा-या कार्यकर्त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पदाधिकारी म्हणून नेमणूक केल्याची बातमी सामना वृत्तपत्रात ज्या दिवशी प्रसिध्द झाली त्याच दिवशी त्याच शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा ‘दे धक्का’ मिळाला आहे. यापूर्वी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शहरप्रमुखपदासाठी भास्कर पाटील यांची नेमणूक जाहीर केली होती, परंतु भास्कर पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषद घेवून मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत असल्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टीप टॉप प्लाझा येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवा झेंडा हातात घेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
खोपट च्या महिला आघाडी विभाग संघटक कविता निकम आणि कोलबाडचे विभागप्रमुख विनोद खानोलकर, कोलबाडचे उपविभागप्रमुख राजेश गवळी, कोलबाडचे शाखाप्रमुख संतोष जाधव, कोलबाडचे उपशाखाप्रमुख सचिन मिडके यांचा यात समावेश आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading