मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षकांना विशेष नैमित्तीक रजा

शिक्षक मतदार संघ कोकण विभाग निवडणुकीसाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त शिक्षण विभाग अनघा कदम यांनी दिली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांमधील फक्त निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या, मतदार यादीत नाव असलेल्या, कार्यरत शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. या दिवशी शालेय कामकाजाचा दिवस असल्याने मुख्याध्यापक, सेवाज्येष्ठ शिक्षक यांनी या अंमलबजावणीबाबत शालेय वर्गाचे नियोजन करावे जेणेकरुन कोणत्याही प्रकारची तक्रार विद्यार्थी – पालक यांच्याकडून येणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading