शहर सौदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत ठाणे महापालिकेला दुसरा क्रमांक

राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग महापालिका गटात ठाणे महापालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने आज या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading