शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक तर हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ४ टक्के आणि ध्वनी पातळीत २४ टक्के वाढ

शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक तर हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ४ टक्के आणि ध्वनी पातळीत २४ टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दिपावली पूर्व आणि दिपावली कालावधीत शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच प्रति क्युबिक मीटरमध्ये 245 मायक्रोग्रॅम इतके आढळले. तसेच, यादिवशी हवेतील नायट्रोजनचे प्रमाण प्रति क्युबिक मीटरमध्ये 56 मायक्रोग्रॅम तर सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण प्रति क्युबिक मीटरमध्ये 29 मायक्रोग्रॅम इतके होते. त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९७ इतका होता. दिपावली पूर्व कालावधीत २१ ऑक्टोबर रोजी हवेतील धुलिकणांचे प्रमाण प्रति क्युबिक मीटरमध्ये 152 मायक्रोग्रॅम, हवेतील नायट्रोजनचे प्रमाण प्रति क्युबिक मीटरमध्ये 48 प्रति क्युबिक मीटरमध्ये तर सल्फरडाय ऑक्साईडचे प्रमाण प्रति क्युबिक मीटरमध्ये 25 मायक्रोग्रॅम इतके आढळले होते. त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३५ इतका होता.
या वर्षी नागरिकांद्वारे दिवाळी सण उर्त्स्फुतपणे साजरा करण्यात आला असून, याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणात देखील वाढ झालेली निदर्शनास आली. सन २०२१च्या दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता सन २०२२ मध्ये दिवाळी कालावधीत हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ४ टक्के तर ध्वनी पातळीत २४ टक्के वाढ झाल्याचे दिसते. मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट निर्मिती साळगावकर यांच्या टीमने हवेच्या गुणवत्तेचा आणि ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास केला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. त्यात हरित फटाक्यांचा वापरही वाढल्याचे लक्षात आले. या वर्षीच्या अभ्यासात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ध्वनी आणि वायू या दोन्हीत वाढ नोंदली गेली. त्याला काही प्रमाणात कमी झालेले तापमानही कारणीभूत ठरले. जड हवेमुळे प्रदूषणात वाढ होते. अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading