सामाजिक संकेतस्थळावर मैत्री करून ठाण्यातील एका महिलेची सुमारे १८ लाखांची फसवणूक

सामाजिक संकेतस्थळावर मैत्री करून दोन अज्ञात व्यक्तींनी ठाण्यातील एका महिलेची सुमारे १८ लाखांची फसवणूक केली आहे. ठाणे शहर पोलीसांनी ही माहिती दिली. या दोन अज्ञात व्यक्तींनी फेसबुकवर मैत्री करून या महिलेची फसवणूक केली. एक महिला आणि एक पुरूष अशा दोघांनी या महिलेला एक वर्षापूर्वी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. या दोघांनी आपली ओळख लंडनमधील न्यूरो सर्जन अशी करून दिली होती. तिच्याशी मैत्री झाल्यावर या दोघांनी ऑगस्टमध्ये आपण एक मौल्यवान भेट पाठवली असून ही भेट कस्टममधून सोडवण्यासाठी काही पैसे भरायला लागतील असा संदेश पाठवला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून या महिलेनं १८ लाखांपेक्षा अधिक रक्कम या दोघांनी सांगितल्याप्रमाणे विविध बँकांत भरली. पण दोन महिने होऊनही भेट न मिळाल्यामुळं तिला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या महिलेनं पोलीसांकडे या फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading