शहरातील ६ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून काल ६ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. दिवा प्रभाग समितीमधील फय्याज खान यांच्या आचारगल्ली शिळफाटा येथील तळ +१ व्याप्त असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील एकुण 32 आरसीसी कॉलम तोडण्यात आलेत. तर दोस्ती कॉम्प्लेक्सच्या मागील बाजुस खर्डी येथील आरीफ सुर्ति आणि भोलेनाथ नगरमधील रफाद खान यांचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती १, नौपाडा प्रभाग समिती १ आणि कळवा प्रभाग समितीमधील १ वाढीव अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading