शहरातील सखल भागात बसविण्यात आलेल्या पाणी उपसा पंपाची अधिका-यांनी केली पाहणी

पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचल्यास ते तातडीने बाहेर काढण्यासाठी शहरातील सखल भागात पाणी उपसा पंप बसविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास दिले होते, त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी पाणी उपसा पंप बसविले आहेत,ते सुस्थितीत असल्याची खबरदारी घेऊन ते योग्य ठिकाणी बसविले आहेत की नाहीत, याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त जी जी गोदेपुरे यांनी पाहणी केली. भांजेवाडी,चिखलवाडी, एम.जी. रोड पंपिग स्टेशन, भास्कर कॉलनी,सिडको रेल्वे ब्रीज, विटावा रेल्वे ब्रीज, ठाणे-बेलापूर रोड आनंद नगर व्यायामशाळा,लव-अंकुश सोसायटी, पोलिस लाईन क्राईम ब्रांच येथे बसविण्यात आलेल्या पंपाची पाहणी यावेळी करण्यात आली. तसेच दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, आनंदनगर जिम, दत्तवाडी, ठाणे महानगरपालिका मुख्यालय आपत्कालीन कक्ष , दशरथ कुटीर सोसायटी माजीवडा प्रभाग समिती, वाघबीळ गाव , लवकुश सोसायटी कोपरी, दाभोळकर चाळ आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी पोर्टेबल पंपाची व्यवस्था करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या काळात महापालिका हद्दीतील विविध भागात पाणी साचल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या आपत्कालिन विभागाच्या १८०० २२२१०८ या टोल फ्री आणि २५३७१०१० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading