कोलबाड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रंगमंचाचे लोकार्पण

कोलबड येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानात खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून नव्याने उभारण्यात आलेल्या रंगमंचाचं लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सावरकर मैदानात गर्दुले आणि जुगाराचे अड्डे सुरू असल्याची बाब विचारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून या मैदानावर झालेले अतिक्रमण काढून मैदान मोकळे करून घेतले. यासाठी विशेष अनुदान निधी, महापालिका निधी तसेच नगर विकास विभाग निधी असे एकूण ५ कोटी 58 लाख खर्च करून ही सुसज्ज अशी इमारत उभी केली. अत्याधुनिक व्यायाम शाळा आणि वाचनालय उभारण्यात येणार असून याचेही लोकार्पण लवकरच होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून 98 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे काम पूर्ण होऊन सावरकर जयंतीच्या दिवशी लोकार्पण केल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading