लोकमान्यनगर येथील मामा-भाचा डोंगरावर अडकलेल्या चार मुलांची सुखरूप सुटका

लोकमान्यनगर येथील मामा-भाचा डोंगरावर अडकलेल्या चार मुलांची आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. काल सकाळच्या सुमारास मामा-भाचा डोंगरावरती ही चार मुलं ट्रेकींगसाठी गेले असता डोंगरावर अडकल्याची तक्रार वागळे अग्निशमन केंद्रात दाखल झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वर्तकनगर पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, १-जीप वाहन आणि १-बाईक ॲम्बुलन्स, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, १-पीकअप वाहन आणि अग्निशमन दलाचे जवान इमर्जन्सी वाहनासह घटनास्थळी गेले.दोन तासांच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या दर्शन पाटील, सार्थक दिघे, हर्षल पाटील आणि स्पंदन नार्वेकर या चारही मुलांची सुखरूप सुटका करण्यात पथकाला यश मिळाले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading