शहरातील प्रवेशद्वारे लक्षवेधक ठरण्यापेक्षा शहरातील मुलभूत प्राथमिक आणि अत्यावश्यक बाबींवर कटाक्ष ठेवावा – धर्मराज्य पक्ष

शहरातील प्रवेशद्वारे लक्षवेधक ठरण्यापेक्षा शहरातील मुलभूत प्राथमिक आणि अत्यावश्यक बाबींवर कटाक्ष ठेवावा अशी अपेक्षा धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे. ठाणे शहराची सिटी ऑफ लेक अशी जगप्रसिध्द ओळख आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी शहरातील तलावांची नोंद घेतली आहे. इतकंच नाही तर बुजवलेले तलाव आणि तलावांच्या दुर्दशेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. गेल्या २२ वर्षात मर्दाडे तलावाचं तीनवेळा सुशोभिकरण झालं पण आज काय परिस्थिती आहे. शहरातील पदपथ सुरक्षित, स्वच्छ आणि चालण्यासाठी योग्य आहेत का याचं लेखापरिक्षण करणं गरजेचं आहे, शहर कितीही सुंदर असलं तरी गल्लीबोळात उघडणारी औषधांची दुकानं हे शहराचं आरोग्य उत्तम असल्याची प्रतिक आहे का, शहराला नियोजनबध्दता आणण्यासाठी शहराला रंगरंगोटीचा कृत्रिम मेकअप करून नव्हे तर शहरातील अंतर्द्वारे नियोजन शास्त्राप्रमाणे लक्षवेधक आणि सुशोभिकरण करून त्याची देखभाल ठेवत शहर लक्षवेधक करावं अशी मागणी नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading