मेट्रोच्या खांबासाठी उभारण्यात आलेली लोखंडी प्लेट अंगावर पडून एका महिलेचा आज दुर्दैवी मृत्यू

मेट्रोच्या खांबासाठी उभारण्यात आलेली लोखंडी प्लेट अंगावर पडून एका महिलेचा आज दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई नाशिक रोड जवळ, उत्सव हॉटेल समोरच्या बाजूला, विवियाना मॉल येथे मेट्रोच्या कामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट सुनिता कांबळे या महिलेच्या अंगावरती पडली. ही मोठी आणि जड प्लेट अंगावर पडल्यामुळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचा-यांच्या मदतीने महिलेच्या अंगावरती पडलेली प्लेट बाजूला करण्यात आली. मेट्रोच्या खड्ड्यातून या महिलेला बाहेर काढून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सुनिता कांबळे या लोकमान्यनगर मध्ये राहत होता. आणि भंगार वेचण्याचं काम करत असल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading