वॉर रुमच्या माध्यमातून खड्डेमुक्त, कचरामुक्त, स्वच्छता, सौंदर्यीकरण कामांचा दैनंदिन आढावा आयुक्त घेणार

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत खड्डेमुक्त शहर, स्वच्छता, सौंदर्यीकरण, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी महत्वाकांक्षी कामे सुरू आहेत, या कामांसाठी दोन ते सहा महिन्यांचा मर्यादित कालावधी ठेवण्यात आला आहे. या कालावधीमध्ये ही सर्व कामे पूर्ण करुन नागरिकांना शहरात दृश्यस्वरुपात होणारा बदल घडवून आणणे आव्हानात्मक आहे. शहरात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा दिवसनिहाय आढावा घेणे अपेक्षित असून त्यासाठी वॉर रुम तयार केली जात असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. ठाणे शहरात खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, शौचालयाची सफाई यासह विविध नागरी कामे हाती घेण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी चारही कामांचा आढावा वॉर रुमच्या माध्मयातून घेतला जाणार आहे. या कामांची छोट्या बाबींमध्ये विभागणी करुन जाणार असून त्यांची कालमर्यादा निश्चित असल्याने दैनंदिन कामाची प्रगती पाहिली जाणार आहे. तसेच वॉर रुमच्या माध्यमातून कामांचा प्रगती अहवाल प्राप्त होईल. प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असतानाच एका बाजूला प्रकल्प अंमलबजावणीची गती, कामाचा दर्जा याची अद्ययावत माहिती उपलब्ध तर होईलच, त्याबरोबरच प्रकल्प अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचा विचार करुन त्याबाबत कामाच्या धोरणात सुधारणा करणे शक्य होणार असल्याचे बांगर यांनी नमूद केले. खड्डेमुक्त रस्ते, शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, शौचालयाची सफाई या चारही कामांसाठी प्रत्येकी एक अधिकारी नियुक्त करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कामांचा दैनंदिन प्रगती अहवाल सादर केला जाईल. हा अहवाल वॉर रुमच्या माध्यमातून आयुक्तांना केव्हाही पाहणे सहज शक्य होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading