ठाण्यातील एक तरूण पत्रकार रविंद्र खर्डीकर यांचं आज दु:खद निधन झालं. ते ३९ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे कर्करोगाचं निदान झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची उपचाराला साथ मिळू शकली नाही. आज त्यांचं निधन झालं. डिजीटल ठाणे या नावानं त्यांनी काही वर्ष दृकश्राव्य माध्यम चालवलं होतं. त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे.