वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील चैन चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंब्रा पोलिसांनी केली अटक

वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील चैन चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंब्रा पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे. आणि त्याच्या कडून दोन लाख एक्कावन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठाणे येथील खर्डी येथे राहणाऱ्या ओला चालक असलेल्या कमलेश गुप्ता याला ऑनलाईन सट्टा खेळण्याचा नाद होता. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला ते कर्ज फेडण्यासाठी त्याने महिलांच्या गळ्यातील चैन चोरण्यास सुरुवात केली. यासाठी जास्त प्रतिकार न करता येणाऱ्या वृद्ध महिलांना टार्गेट करत होता. यासाठी तो चोरीची बाईक वापरून वृद्ध महिलांना हेरून ठेवत असे आणि ती महिला राहत्या इमारती मध्ये जिन्याने घरी असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून पळून जात असे. अशी त्याच्या चोरीची कार्यपध्दती होती असे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगीतल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading