वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्याचं केंद्रीय श्रममंत्र्यांचं आश्वासन

वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी दिले. ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युशन असोसिएशनच्या पदाधिका-यांबरोबर श्रममंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिलं. या बैठकीत १५ ऑक्टोबर हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युशन असोसिएशनचे राष्ट्रीय सल्लागार संजय केळकर यांनी केली. असंघटित क्षेत्रातील कामगारांना ज्याप्रमाणे सरकारकडून सुविधा मिळतात. त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेत्यांना सर्व योजनांचा लाभ मिळावा. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर अथवा प्रत्येक राज्यात एक कल्याणकारी महामंडळ बनवावं अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा देता येईल आणि या योजना कशाप्रकारे कार्यान्वित करता येतील याबद्दल सविस्तर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं आश्वासन श्रममंत्र्यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading