ठाण्यात ३४४ मास्क न परिधान करणा-या व्यक्तींवर कारवाई

वाढता करोना संसर्ग टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून या कारवाई अंतर्गत ३४४ मास्क न परिधान करणा-या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव वाढला असून हा प्रभाव कमी करण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. या अंतर्गत मनाई आदेशाचे उल्लंघन करणा-या ७ जणांवर तर मास्क न परिधान करणा-या ३४४ जणांवर कारवाई करण्यात आली. तसंच शासनानं कोरोना संदर्भात जारी केलेले नियम आणि सूचना पाळण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे. मंगल कार्यालय तसंच आस्थापनांमध्ये ५ बैठका घेण्यात आल्या आहेत. तर १४९ नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही पोलीसांतर्फे केलं जात आहे. ठाणे वाहतूक शाखेतर्फेही अशी कारवाई केली जात असून गेल्या ४ दिवसात १ हजार १६९ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे तर कर्णकर्कश्श आवाज करणा-या ७९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading