वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभाराची चौकशी करण्याची आमदार संजय केळकरांची मागणी

आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीवर बोलताना ठाण्यातील वृक्ष प्राधिकरण विभागाच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून या विभागाने आतापर्यंत घेतलेल्या संपूर्ण निर्णयाची थर्ड पार्टी ऑडिट चौकशी करण्याची मागणी केली. तसेच ठाणेकरांना आर्थिक भुर्दंड न घेता इमारती अंतर्गत वाढलेल्या फांद्या आणि झाडे महापालिकेने कोणतीही फी न करता छाटणी करावी अशीही मागणी त्यांनी केली. वाहतुकी संदर्भात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत पालिका प्रशासनाने योग्य काळजी घ्यावी आणि तशा प्रकारचे निर्देश संबंधितांना द्यावे अशी मागणी केळकर यांनी विधानसभेत केली. पंधरा वर्षांपूर्वी वृक्ष पडून पवार या वकिलांचा मृत्यू झाला होता त्यांच्या पत्नीला प्रीती पवार यांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी संजय केळकर यांनी केली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading