पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एका युवकाचा बुडून मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. काल उपवन तलाव येथे दुपारच्या सुमारास आदित्य पवार हा १७ वर्षीय युवक ४ ते ५ मित्रांसोबत पोहायला गेला होता. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो तलावामध्ये बुडाला होता. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं धाव घेतली आणि आदित्यचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ३ तासांच्या प्रयत्नानंतर आदित्यचा मृतदेह हाती लागला. आदित्य पवार हा मुलगा आर. जे. ठाकूर महाविद्यालयात १२वी मध्ये शिकत होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading