पडघा येथील भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

पडघा येथील खडवली फाट्याजवळ कंटेनर आणि जीपमध्ये झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू तर तर तिघेजण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पडघा येथून विद्यार्थी असलेली एक जीप खडवली रेल्वे स्थानकाकडे जात असताना हा अपघात झाला. या भीषण अपघातात चिन्मयी शिंदे, रिया परदेशी, चैताली पिंपळे, संतोष जाधव, वसंत जाधव आणि प्रज्वल फिरके या ६ जणांचा मृत्यू झाला तर दिलीप विश्वकर्मा, चेतना जसे आणि कुणाल भामरे हे तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर भिवंडीतील एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading