वीज चोरीवर कारवाई न करण्यासाठी महावितरणच्या अभियंत्याला २० हजार रूपयांची लाच दिल्याप्रकरणी एका खाजगी एजंटला रंगेहात अटक

वीज चोरीवर कारवाई न करण्यासाठी तसंच सोसायटीत नवीन मीटर घेण्याकरिता महावितरणच्या अभियंत्याला २० हजार रूपयांची लाच दिल्याप्रकरणी एका खाजगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे. महावितरणच्या अतिरिक्त अभियंत्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दिली होती. इरफान पटेल या वायरमननं रेश्मा रेसिडेन्सी या गृहसंकुलातील वीज चोरीवर कारवाई न करण्याची तसंच सोसायटीमध्ये २७ नवीन विद्युत मीटर बसवून देण्याची मागणी केली होती. यासाठी पटेलनं अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना २५ हजारांचं प्रलोभन दाखवलं होतं. याबाबत अभियंत्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत पथकानं इरफान पटेलला ३० हजार रूपयांची लाच देताना रंगेहात पकडलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading