उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी-पोलीस ठाण्यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव

ठाणे पोलीस आयुक्तालयातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी-पोलीसांचा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर येथील न्यायालयातील एकूण ३७८ दाव्यांमध्ये दोषसिध्दी झालेल्या गुन्ह्यातील तपास अधिकारी आणि अंमलदार तसंच न्यायालयामध्ये नियुक्त केलेल्या पैरवी अधिकारी, अंमलदार यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं. महिला आणि बालकांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग, लहान मुलांवरील अत्याचार अशा प्रकरणात कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यशस्वी ठरलेल्या अधिका-यांना गौरवण्यात आलं. न्यायालयीन सुनावणीच्या वेळी दिलेल्या विशेष सहभागाबद्दल २९ पैरवी अधिकारी आणि अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. सेवानिवृत्त झालेल्या ज्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी त्यांच्या सेवाकालामध्ये केलेल्या गुन्ह्याच्या तपासात दोष सिध्दी प्राप्त झाली आहे अशा ३३ सेवानिवृत्त अधिका-यांना यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं. जे पोलीस सध्या कार्यरत आहेत आणि अशा कौशल्यपूर्ण तपास केलेल्या गुन्ह्यांमध्ये दोष सिध्दी प्राप्त झाली आहे अशा ६५ अधिकारी आणि अंमलदारांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक प्रफुल्ल कडव यांनी डिसेंबर अखेर एकूण ३३२ बेवारस अकस्मात मृत्यू प्रकरणांची चौकशी करून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना विशेषत्वानं गौरवण्यात आलं. फेब्रुवारी ते नोव्हेंबर या कालावधीत न्यायालयामध्ये खून आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा होऊन दोष सिध्दी करणा-या मुंब्रा,नौपाडा आणि कापुरबावडी पोलीस ठाण्यातील ३ अधिका-यांना सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला. न्यायालयातील दाव्यामध्ये अधिकतम दोषसिध्दी करणा-या ९ पोलीस ठाण्यांना विशेष चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये मुंब्र्याला प्रथम, कळवा आणि कापुरबावडीला द्वितीय, निजामपुरा आणि कासारवडवलीला तृतीय तर प्रथम वर्ग न्यायालयातील दाव्यांमध्ये दोष सिध्दी करणा-या कळवा पोलीस ठाण्याला प्रथम, नौपाड्याला द्वितीय, कापुरबावडी आणि नारपोली पोलीस ठाण्याला तृतीय क्रमांकाचं सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading