ठाणे महापौर चषक संगीत भजनी स्पर्धेचं २७ जानेवारीला आयोजन

ठाणे महापौर चषक संगीत भजनी स्पर्धेचं आयोजन २७ जानेवारीला करण्यात आलं आहे. आनंद दिघे यांच्या जयंतीचं औचित्य साधून शक्तीस्थळावर या भजनी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धेत मोठ्या संख्येनं भजनी मंडळांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलं आहे. ही स्पर्धा भीमसेन जोशी यांचे शिष्य नंदकुमार पाटील यांच्या संयोजनाखाली होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास २० हजार, द्वितीय क्रमांकास १५ हजार, तृतीय क्रमांकास १० हजार तर ४ उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रत्येकी ५ हजार रूपये दिले जाणार आहेत. महिला आणि पुरूष संगीत भजनी मंडळाकरिता सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी असून भजनी मंडळांनी आपले अर्ज दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापकांकडे जमा करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading