विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

ठाणे शहरातील राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या, विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता पोखरण रोड नं. 2 येथील बाबुराव मारुतीराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर आणि महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृहाचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर पोखरण रोड नं. 2 येथील सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, कासारवडवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, ठाणे महापालिकेकडील सुविधा भूखंडावरील आदिवासी विद्यार्थी वसतीगृह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आणि डिजीटल ॲक्वेरियम या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading