ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आणि सत्र न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा वकील संघटना आणि दि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योगामुळे असाध्य आजार देखील बरे होतात. योगा केवळ एका दिवसाकरीता मर्यादित न ठेवता योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येकानेच करावा असे आवाहन अभय मंत्री यांनी केले. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यात योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरूस्त ठेवु शकतो. शिवाय मानसिक ताणतणाव, भावनिक चढ-उतार, चित्त स्थिर राहते योगासन हे केवळ व्यायाम नाही, तर हे आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. खरे आरोग्य तेच ज्यामध्ये शरीरासोबत मनही निरोगी राहते. योगा मुळे शरीरासोबत आपले मनही निरोगी राहते, असे प्रतिपादन श्रीमती मीता राउत यांनी केले.
या योग शिबिरामध्ये न्यायिक अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या दर योग शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे मीता राउत, वसुधा भिरूड, प्रभावत्सन बालन आणि नम्रता बोबडे यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त मध्यवर्ती कारागृहात सुध्दा योग शिबिर घेण्यात आले. योग शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिव्हींग च्या प्रतिनिधींतर्फे योगासनांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुका विधी समित्यांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading