विवा ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी केली पदकांची कमाई

ऐरोली येथील व्हिबग्योर हायस्कूलमध्ये झालेल्या विवा ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी पदकांची कमाई केली. यामध्ये जान्हवी कुलकर्णी आणि हर्ष पिसाळ यांनी सुवर्णपदक पटकावले. श्लोक सरोदे आणि रूद्र शेलवले यांनी रौप्यपदक तर प्रांशु पायगुडे, अथर्व मुकादम आणि गोपाळ पणशीकर यांनी कांस्य पदक पटकावलं. हे सर्व खेळाडू सरस्वती क्रीडा संकुलात प्रशिक्षक देवीसिंग राजपूत आणि सह प्रशिक्षक साहिल मेंडन यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युदोचा सराव करतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading