विवाहित महिला डॉक्टरांसाठी आयोजित सौंदर्य स्पर्धेत वैद्यकिय अधीक्षक डॅा.माधवी पंदारे (खराडे) यांना “स्टनिंग लेडी” हे टायटल

मेडिक्वीन मेडिको पिजंट यांच्यातर्फे राज्यातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी आयोजित सौंदर्य स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील गोवेली,ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधीक्षक डॅा.माधवी पंदारे (खराडे) यांना “स्टनिंग लेडी” हे टायटल मिळाले तर राज्यातील स्पर्धेत निवडक सुमारे २०० विवाहित डॉक्टर स्पर्धकांमध्ये डॅा.माधवी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत उचित सन्मान करण्यात आला असल्याने त्यांची अंतिम ८ स्पर्धकांमधे निवड करण्यात आली. डॅा.माधवी ह्या कान,नाक,घसा तज्ञ असून त्यांनी राज्यभरातील सुमारे २०० निवडक विवाहित महिला डॉक्टरांमध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धकांमध्ये टॉप आठ मध्ये त्यांची निवड झाली असल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले. पुण्यात या तीन दिवसीय आयोजित विवाहित डॉक्टरांच्या सौन्दर्य स्पर्धेत अभिनेते आदिनाथ कोठारे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .डाॕ नंदिता पालशेतकर यांनी सर्व सहभागी महिला डाॕक्टरांना मार्गदर्शन केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading