मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त प्रमाणात करावा – ईश्वर सूर्यवंशी

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ठाणे जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकिल संघटनेच्या वतीने मराठी भाषा विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. १४ ते २८ जानेवारी २०२२ हा पंधरवडा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ वकिल गजानन चव्हाण, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या डॉ. श्रीमती माधुरी पाथरकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्त्यांनी मराठी भाषा संवर्धन विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. मराठी भाषेची महती, मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषा कशी लोप पावत चालली आहे, मराठी भाषेचा कार्यालयीन कामकाजात वापर आदी माहिती देऊन सध्याच्या शिक्षण पद्धतीवर प्रकाश टाकला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  – यांनी मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त प्रमाणात करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. इंदलकर, 7 वे सह. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए.सी. डोईफोडे हे उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading