विभागीय आयुक्तांकडून मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा

राज्यात १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकवर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक अण्णासाहेब मिसाळ यांनी आज जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा आढावा घेतला.तसेच जिल्ह्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबरोबरच मतदार जनजागृती आणि नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. मतदार याद्यांमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी तात्काळ दुर कराव्यात. नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेली मयत मतदार, दुबार नाव नोंदणी असलेले मतदार आणि स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुद्धा या दरम्यान करणे आवश्यक आहे. ही कार्यवाही करताना योग्य ती शहानिशा केल्यानंतरच मतदारांची नावे वगळावी. मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्राधान्यक्रमाने कराव्यात अशा सुचनाही त्यांनी यावेळी केली. स्विप कार्यक्रम आंतर्गत जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मिसाळ यांनी दिले. यावेळी आण्णासाहेब मिसाळ यांनी मतदार यादी, संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आढावा,मतदार छायाचित्र त्रुटी ,मतदारांचे अचुक ओळख पत्र तयार करणे,मतदार वगळणी, मतदार यादीतील तांत्रिक तृटी दुरुस्ती करणे ,भारत निवडणूक आयोगाच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रारीचा आदींचा विषयनिहाय आढावा घेतला. दावे आणि हरकती स्विकारण्याचा कालावधी मंगळवार 15 डिसेंबर 2020 असा आहे. विशेष मोहिमांचा कालावधी दावे-हरकती स्विकारण्याचा कालावधीत मुख्य निवडणूक अधिका-यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार असे आहेत. दावे- हरकती निकालात काढण्यासाठी 5 जानेवारी 2021 पर्यंत कालावधी आहे. 14 जानेवारी 2021 पर्यंत प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे.डेटाबेसचे अदयावतीकरण आणि पुरवणी यादयांची छपाई असा आहे. 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करणे असा आहे.
रहिवाश्यांनी १५ डिसेंबरपर्यंत योग्य तो फॉर्म नमुना भरणे. फॉर्म नमूना नं. 6- नव्याने मतदार नोंदणी करणे ,फॉर्म – नमूना नं. 7 मयत मतदार , कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणेकामी , फॉर्म – नमूना नं. 8 – मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करणेकरिता ,फॉर्म नमूना नं. 8 अ – मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता भरणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading