विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराला २८ लाख रूपये खर्च करण्याची मुभा

विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला २८ लाख रूपये खर्च करण्याची मुभा आहे. सर्व उमेदवारांनी या मर्यादेतच निवडणूक खर्च करावा असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे. विविध राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिका-यांनी हे आवाहन केलं. २७ सप्टेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून निवडणुकीत होणा-या खर्चाचा लेखाजोखा उमेदवारांना जिल्हा निवडणूक विभागास देणं बंधनकारक आहे. प्रत्येक उमेदवारानं यासाठी स्वतंत्र खातं उघडणं आवश्यक असून त्याचा क्रमांक नामनिर्देशन पत्र भरताना निवडणूक निर्णय अधिका-याकडे द्यायचा आहे. रोखीनं केलेल्या व्यवहारांची नोंद बँक नोंद वही तसंच रोख नोंद वहीमध्ये ठेवणं आवश्यक आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न केल्यास संबंधित उमेदवार ३ वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतो असंही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading