शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या सजावटीत देशभरातील शक्तीपीठांचं दर्शन

शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रौत्सवामध्ये यंदा देवीच्या नवरूपांचे दर्शन घेता येणार आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. देशातील शक्तीपीठातील जागृत देवांचे दर्शन देखाव्याच्या रूपात या ठिकाणी होणार आहे. नवरात्रौत्सवामध्ये शक्तीपीठांच्या स्थळी गर्दी असते. त्यामुळं अनेक भाविकांना दर्शनाला जाता येत नाही. ही अडचण ओळखून शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळानं यंदा कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका, तुळजापूरची भवानी, वणीची सप्तश्रृंगी, कार्ल्याची एकविरा, गुजरातची चामुंडा, कलकत्त्याची कालिमाता, कटाराची वैष्णोदेवी यांच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नवरात्रौत्सवात विविध करमणुकीचे कार्यक्रम, भजन, गरबा, दांडिया, गुणवंतांचा सत्कार, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading