नवरात्रौत्सवामध्ये नवरंगांबाबत कोणत्याही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रौत्सवामध्ये नवरंगांबाबत कोणत्याही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही. तसंच भविष्य, पाप, पुण्य, देवीची कृपा-अवकृपा आणि रंगांचाही संबंध नसल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. सोमण यांनी नवरात्राच्या दिवसात रोज असणा-या नवरंगांची माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. नवरात्राच्या ९ दिवसात एकाच रंगाची वस्त्रं नेसल्यानं महिलांना समता, एकता आणि सुरक्षितता वाटते. तसंच आनंदाची प्राप्ती होते म्हणून ही नवरंगाची प्रथा पडली असावी. नवरात्रातील हे रंग वारावरून समजले जातात. यावर्षी रविवारी म्हणजे २९ सप्टेंबरला केशरी अथवा भगवा, सोमवारी ३० सप्टेंबरला पांढरा, मंगळवार १ ऑक्टोबरला लाल, बुधवार २ ऑक्टोबरला निळा, गुरूवार ३ ऑक्टोबरला पिवळा, शुक्रवार ४ ऑक्टोबरला हिरवा, शनिवार ५ ऑक्टोबरला राखाडी, रविवार ६ ऑक्टोबरला गुलाबी तर सोमवार ७ ऑक्टोबरला मोतिया अथवा पर्ल व्हाईट असे रंग आहेत अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading