विधानसभा निवडणुकीत २२० ते २४० जागा मिळण्याचा एकनाथ शिंदे यांना विश्वास

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाला २२० ते २४० जागा मिळतील असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी औपचारिकपणे बोलताना शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याबाबत बोलताना त्यांनी ही योग्य गोष्ट असल्याचं सांगितलं. जिल्ह्यामध्ये किती जागा मिळतील असं विचारलं असता त्यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असं सांगितलं. आपण कशाच्या मागे धावत नाही. आपण आपलं काम करत राहायचं त्याचं योग्य फळ मिळतं असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading